जोग कुलाविषयी सामान्य वृत्त.

जोग हे आडनाव मुख्यतः चित्तपावन ब्राह्मणामध्ये आहे. ते शुक्लयजुर्वेदी
माध्यंदिन ब्राह्मणातही आढळते. हे आडनाव दुसऱ्या एखाद्या आडनावातून निघाले,
किंवा जोग आडनावावरुन दुसरे पोट आडनाव निघाले, असे क्षेत्रोपाध्यायांकडील
लेखात आढळत नाही. या पुस्तकांत केवळ चित्तपावन जोग कुलाची माहिती
दिलीआहे.

                                                      नांदिवडे 

चित्तपावनांची चौदा गोत्रे आहेत. चित्तपावन ब्राह्मणांच्या एकूण तीनशे  आडनावांपैकी निम्म्याहून अधिक आडनांवे शांडिल्य व काश्यप या गोत्राची आहेत. चित्तपावनांपैकी पुष्कळ ब्राह्मण ऋग्वेदी, आश्वलायन. सूत्राचे, शाकल शाखेचे आहेत. बाकीचे कृष्णयजुर्वेदी, सत्यापाढ (हिरण्यकेशी) सूत्राचे, तैत्तिरीय शाखेचे आहेत. देखरुखे ब्राह्मणांतही हिरण्यकेशी सूत्राचे लोक आहेत. सत्याषाढ ऋषीचे दुसरे नाव हिरण्यकेशी. तैत्तिरीय शाखेच्या सहा सूत्रांपैकी जसे एक सत्याषाढ  (हिरण्यकेशी) सूत्र आहे, तसेच एक आपस्तंब सूत्र आहे. पुष्कळसे तेलंगी ब्राह्मणआपस्तंब सूत्राचे आहेत. चित्तपावनांमधील हिरण्यकेशी सूत्राच्या ब्राह्मणांना आपस्तंब संबोधिणे हे सयुक्तिक नाही. आश्वलायन व हिरण्यकेश या सूत्रांच्या आडनावांच्या संख्यांचे प्रमाण सातास तीन आहे. जोग कुलाचे गोत्र काश्यप, काश्यप गोत्राची प्रचलित आडनावे पुढीलप्रमाणे  ओगले, करमरकर, कातरणे (गोखले), कान्हेरे काशीकर, खाडिलकर, गानू, गोखले, छत्रे, जोग, जोशी, ठोसर, ढबू, दातीर, दारशेतकर  (भट), पंडित (भट), पागे (लेले), पालकर (गोखले), पुराणिक (भट), फडणीस  (भानू), फडतरे (भट), फाळके (भट), बडे (गोखले), बिनीवाले (भट) बिनलकर, बेंद्रे (ठोसर), भट, भानू मारवलकर, रास्ते (गोखले), लवाटे, लेले, वर्तक

Begin typing your search term above and press enter to search. Press ESC to cancel.