कुलवृत्तांत

अध्यक्ष, कुलवृत्तान्त प्रकाशन समिती, १९९०, पहिल्या जोग कुलवत्तान्ताचे काम ज्या थोर पुरुषांनी सुरु केले ते . श्रीपाद बाजी जोग व कै. रंगनाथ भिकाजी जोग तसेच ज्यांनी अपार श्रम घेऊन ते काम पूर्ण केले ते के. प्रा. शंकर रामचंद्र कानिटकर यांचे गम्रतापूर्वक स्मरण करून हया जोग कुलवृत्तान्ताची कामासंबंधी माहिती पुढे  देत आहे. कुलवृत्तान्ताचे काम किती जिकीरीचे व अवघड असते हयाची कल्पना येण्याकरिता, पहिल्या कुलवृत्तान्ताची त्रोटक प्रस्तावना व निवेदन या आवृत्तीत इतरत्र दिले आहे. १९९० साली छापून तयार होणारे हे काम ४५ वर्षांपूर्वी नांदिवडे येथे श्री. पु. त्रिं. जोग यांनी संकलन करण्यासाठी चालू केले. संकलनाचे काग जवळजवळ संपल्यावर ते बाई संमेलनापूर्वी पुण्यात आले होते व पुढील कार्यवाही म्हणजे, संपादन, छपाई व पैसे जमा करणे वगैरे कोणावर तरी सोपवून टाकावी असे त्यांनी सुचविले व पुण्यातील माहितीच्या चार जोगांची बैठक पी. आर, जोगांचे राम मंदिरात बोलावली व त्या बैठकीत एक प्रकाशन समिती नेमण्यात आली व पर्यायाने ही जबाबदारी आमच्या समितीच्या गळयात पडली.

 कामाला सुरुवात केली म्हणजे जोग कुलबंधुंना द्रव्य सहाय्यासाठी आवाहन केले मग एक एक अनुभव येवू लागले. रोज पत्रे परत येवू लागली गालक सापडत नाही, पत्ता चुकीचा आहे वगैरे. त्यानंतर श्री. पु. त्रि. यांचेकडून माहिती न मिळालेल्या जोगांची यादी मिळाली. मग पैसे जमविणे, लोकांची माहिती जमविणे या कामाला सुरुवात झाली. अनेकांची जोडली आहे. त्यातील काही खरेच सापडले नाहीत व काहींनी आमच्या माहिती मिळविली तरीसुद्धा माहिती न मिळालेली लोकांची एक यादी सोबत पत्रव्यवहाराला दाद दिली नाही. असो. फारच थोड्या लोकांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर श्री. शंकर अनंत व श्री. ग. ना. जोग यांनी हिंड्न प्रत्यक्ष गाठीभेटीस सुरुवात केली तेव्हा मात्र पुष्कळच चांगला अनुभव आला. स्वागत व व्यसाहाय्य पण केले, थोडे चुकारही भेटले. एकंदर जोग ही माणसेच आहेत व त्या कुलामध्ये सर्व तहेची नमुनेदार माणसे भेटतात. सर्वात मोठा प्रतिसाद वाईला भरलेल्या जोग कुल संमेलनाचे वेळी मिळाला. कारण त्या संमेलनात सुमारे २६५ कुलबंधुभगिनी आले होते. वृत्तांत समालोचन

 

(१) कुलवृत्तांताचे संकलन हे पारंपारिक पद्धतीने झाले आहे. त्याला

हवी होती. उदाहरणार्थ रक्तगट व्याधी जमा करावयास पाहिले होती. परंतु ही
असणार नाही म्हणून त्यासाठी प्रयत्न केला योडी विज्ञाननिष्ठा वगैरेसारखी माहिती माहिती प्रत्येकाजवळ नाही.

 

(२) जोग म्हणून अभिमान बाळगण्यामध्ये पिसावांचा प्रभाव आहे. आपल्या सर्वाच्या घडणीमध्ये बढील आजोबांच्या बरोबरीने आई आजी यांचाही वाटा आहे. त्या दृष्टीने आलेली माहिती अपुरी वाटते.

 

(३) जोग कुलामध्ये सामाजिक जागृति बरीच असावी असेही वाटते.गेल्या ४० वर्षांत

जोगांच्या संख्येत ५० टक्केपेक्षा कमी वाढ झाली आहे. ४ किंवा जास्त अपत्ये असणाऱ्यांची संख्या बरीच कमी आहे. २ ते ३

अपत्ये झाल्यावर मुलगा किंवा मूलगी हयाचा विचार न करता पुष्कळांनी संतती नियमन केले आहे. हमाची लोकांना

माहिती व्हावी म्हणून ज्यांना फक्त मुलीच आहेत त्यांचा वंशावळीत उल्लेख आवर्जून करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

(४) मूळ गांवी अजूनही जोगांची वस्ती आहे व बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या जोगांची आपुलकीने विचारपूस होते. डॉ. जोग जयगड

हे नाव व घर आसमंतातल्या सर्वच लोकांना (त्यांत पाहुणे जोगही आले) विश्रांतिस्थान म्हणून सुप्रसिद्ध आहे. दो, मनोहर जोग यांनी

 वाडवडिलांचा हा वारसा अत्यंत आनंदाने व कष्ट  घेऊन चालविलेला आहे.

(५) जोगांच्या घराण्यांत अजूनपर्यंत तरी धर्मांतर केलेला कोणी आढळला नाही.

 

जोग कुल विश्वस्त गिधी या नावाने एक संस्था स्थापन झाली असून तिचे मुख्य कार्यालय नांदिवडे येथे आहे आणि संलग्न कार्यालय पुण्यात सुरु केले आहे. त्या संस्थेशी सर्वांनी संपर्क ठेवावा. आपल्या घरातील सुखदखाच्या सर्व गोष्टींची माहिती तेथे कळयावी. उदाहरणार्थ, मंगल कार्याची पत्रिका कन्हाटेश्वरास पाठयायी, जन्म-मृत्युची माहिती कळवावी तसेच बदललेला पत्ता, आपण केलेली कौतुकास्पद कामगिरी याची नोंद तेथे कळवावी. जोग कुल वृत्तान्त हा संगणकावर केला असल्यामुळे सर्व माहिती कायम स्वरुपात डिस्कवर आहे त्यात वेळोवेळी नदिन माहितीचे संकलन केल्यास कुल वृत्तान्त अद्ययावत राहील व पुढील विज्ञानाधिष्ठित काळात आजच्या सारखा सई खटाटोप करण्याचे वाचेल. जोग कुलाचे आपण काहीतरी देणे लागतो असे नैतिक बंधन वाटले पाहिजे व त्या दृष्टिने जोग कुल विश्वस्त निधीस प्रत्येकाने किमान रु.१०१ देऊन सभासद झाले पाहिजे. समालोचनात असे आवळले की, ९५ टके जोग खाऊन पिऊन सुखी आहेत. पर्यायाने राहिलेल्या ५ टके बंधुभगिनींना मदत करणे आपले नैतिक कर्तव्य आहे असे आम्हाला वाटते. याच्याशी आपण सर्व सहमत हाल अशी आम्हांस खात्री आहे. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली म्हणजे पहिल्या कुल वृत्तान्ताच्या वेळी ज्या अडचणी आल्या तशाच आजही येत आहेत. तरी त्यावर सर्व जोगांच्या साहाय्याने मात कल्न कुल वृत्तान्त ग्रंथ आपणासमोर ठेवरा आहे. स्नेहसंमेलन १३ च्यात गांदिवडे येथे कुलवृत्तांत १९९० प्रकाशित करण्याचे ठरले परंतु १९८९ पर्यंत कामास सुरुवात झाली नाही. सप्टेंबर १९८९ मध्ये श्री. वि. म. तथा दादासाहेब जोग, श्री. पांकर अनंत तथा बाळासाहेब जोग व त्यांच्या मदतीस श्री. अशोक रामचंद्र, श्रीकांत गोविंद व वि. ल. जोग यांनी अविधांत दिवसरात्र मेहनत घेऊन सौ. शामलाबाई सहस्रबुद्धे, पुणे यांचे मार्गदर्शन व साहाय्याने ठरल्याप्रमाणे संमेलनापूर्वी अतिशय सुरेख जोग कुल वृत्तान्त १९९० छापून तयार केला आहे. नांदिवड्यास होत असलेल्या तेराव्या संमेलनात वाईचे संमेलनात ठरल्याप्रमाणे कुल वृत्तांत प्रकाशित होप्याचे कामी श्री. व्हि. एम्. जोग, पुणे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे न मिळालेली माहिती मिळवून वृत्तान्त जास्तीत जास्त अद्ययावत करण्याचे श्रेय श्री. शंकर अनंत यांचे आहे. श्री. वसंत बाळकृष्ण जोग, सोलापूर यांनी पुस्तकातील फोटो कलात्मक काढून पुस्तकास सौंदर्य आणले. पुस्तक सुंदर फोटोंनी सजविण्याकरिता ज्या जोग बंधुंनी उदारतेने अर्थसाहाय्य केले

त्यांचा उल्लेख फाटोचे बाजूस केलेला आहे. या कामी सुमारे पन्नास हजार रुपये खर्च आला आहे. याशिवाय अनेक पुणेकर जोग मंडळींनी य श्री. पु. त्रिं. व डॉ. जोग जयगड यांनी बहुमोल कामगिरी केली आहे. सर्वांच्या परिश्रमातून आज हा जोग कुलवृत्तान्त १९९० निर्माण होत आहे. प्रकाशन समितीच्या सर्व सदस्यांनी अनमोल कष्ट करून हा कुल वृत्तान्त १९९० पुरा करण्याचे काम कुलस्वामी श्री कहाटेश्वर कृपेने पुरे केले त्याबद्द  सर्वांना धन्यवाद. 

प्रस्तावना लेखक प्रा. डॉ. द. वा. जोग व सौ. शामलाबाई सहनबुद्धे

यांची प्रकाशन समिती ऋणी आहे.

सर्व जोग बंधुभगिनींना सुयश व शुभेच्छा.

श्री कन्हारेश्वर

नांदिवडे.

माघ शु.१ शके १९१७.

(२७.१.१९८९.)

(स्नेहसंमेलन १३वे)

प्र. बा. जोग

 

अध्यक्ष प्रकाशन समिती (पुणे)

 

Begin typing your search term above and press enter to search. Press ESC to cancel.