जोग कुल संमेलन

एक तपाची वाटचाल १९७७ ते १९८९.
जगांतील सर्व जोग आडनांव असणाऱ्या मंडळींचा मूळ पुरुष नांदिवड्याचा आणि त्यामुळेच सर्व जोग मंडळींचा कुलस्वामी श्री कन्हाटेश्वर व कुलस्वामिनी श्री जोगेश्वरी. यांची प्राचीन देवस्थाने नांदिवडे येथे आहेत.  १९ व्या व २० व्या शतकांत अनेक जोग कुटुंबे व्यवसाय व  उद्योगधंदा वा नोकरीसाठी नांदिवड्याबाहेर गेली.

 काळाच्या ओघांत व परिस्थितींत बाहेर गेलेल्या जोगांचे पुढील पिढ्यांना मूळ गांवाचा व कुलस्वामीचाही विसर पडला . परंतु १९५२ मध्ये कै. चिं. वि. जोग यांनी जोग कुलवृत्तांत प्रकाशित केला. त्यानंतर अल्प प्रमाणांत का होईना बाहेरील जोग मंडळींना नांदिवडे व श्री कन्हाटेश्वर माहित झाला.नांदिवडे जयगड परिसरांत ९-१० जोगांची घरे अस्तित्त्वात आहेत.
त्यांचेकडून श्री कन्हाटेश्वर व श्री जोगेश्वरीचे पूजेची कायम स्वरुपाची योजना होणे शक्य नव्हते. त्यातच श्री कन्हाटेश्वर मंदिर जीर्ण झाले होते.परंतु  कै. हरी वामन जोग, कल्याण यांनी नोकरी निवृत्तिनंतर अमाप कष्ट करून सुमारे १५ हजार रुपये अनेक जोग बंधु-भगिनींना गाठून जमविले व  १९६७-६८ चे सुमारास सर्व ग्रामस्थांचे मदतीने देऊळ दुरुस्त केले. याच सुमारास ग्वाल्हेरचे वृद्ध कै. श्री. ज. जोग आयुष्यात प्रथम श्री कन्हाटेश्वर दर्शनासाठी आले असता त्यांनी नित्य पूजेसाठी रु.५१- प्रत्येकाकडून घेणे व असे किमान देणगीदार ३६५ जमवावे व त्या रकमेच्या व्याजातून नियमित पूजा करण्याची योजना जयगडचे डॉ. मा. वि. जोग यांना सुचविली. त्यांचे सूचनेनुसार डॉ. जोग यांनी श्री. दा. पु. जोग, श्री. पु. त्रिं. जोग, श्री. म. शं. बापट यांना एकत्र जमवून सूचना योग्य व व्यवहार्य ठरल्यामुळे श्री क-हाटेश्वर पूजा व्यवस्था मंडळ, नांदिवडे ही संस्था स्थापन करून रजिस्टर केली. त्याचे पहिले अध्यक्ष श्री. पु. त्रिं. जोग निवडले गेले व त्यांनी सुमारे ८ वर्षे ते कार्य केले. त्यानंतर आजतागायत डॉ. जोग अध्यक्षीय जबाबदारी सांभाळत आहेत.

सदर योजना राबवित असता जोग कुलोत्पन्नाचा कुलस्वामी श्री कन्हाटेश्वर याचे दर्शनास अधिकात अधिक बाहेरील जोग मंडळी आल्यास ते या पूजाव्यवस्थेस चांगला प्रतिसाद देतील त्याशिवाय त्यांच्या सहकार्याने . मंदिर दुरुस्ती वेळचेवेळी होऊन ते चांगल्या स्थितीत राहील हे लक्षात आले, बाहेरगावी राहणारी जोग मंडळी नांदिवड्यास आल्याशिवाय हे शक्य नव्हते. ते येण्यासाठी काय करावे या विचारातून डॉ. जोग जयगड व श्री, पुत्रि., श्री. दा. पु. जोग वगैरे नांदिवडेकर जोग मंडळींनी सभा घेऊन जोग बंधू भगिनींचे संमेलन भरवावे असे ठरविले. त्याला के, चिं, वि, जोग, कै. रा. श्री. जोग कै. ह. वा. जोग यांचा पाठिंबा मिळाला. दुर्दैवाने पहिले संमेलन होण्यापूर्वीच कै. चिं. वि. व कै. रा. श्री. यांचे निधन झाले. परंतु सुदैवाने
कै. ह. वा. जोग हे हयात होते व त्यांनी उत्साहाने भाग घेतला व मार्गदर्शन केले.

नांदिवडे येथे डिसेंबर १९७७ मध्ये डॉ. जोग यांचे अध्यक्षतेखालील स्थानिक नांदिवडेकर जोग मंडळींनी प्रथम संमेलन आयोजित केले. अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद बाहेरील जोग बंधु-भगिनींनी दिला व पहिले जोग स्नेहसंमेलन प्रा. डॉ. दत्तात्रय वि. जोग, मुंबई यांचे अध्यक्षतेखाली यशस्वी झाले, आलेल्या जोग मंडळींनी दर वर्षीच असे कौटुंबिक जोग संमेलन भरविण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला व त्यानंतर १९८९ पर्यंत १२ संमेलने झाली व १९९० मध्ये १३वे संमेलन नांदिवडे येथे होत असून त्यात जोग कुलवृत्तान्त १९९०
प्रकाशित होते आहे हा सुयोग. तिसरे संमेलन १९८० साली जानेवारीत गोव्यात कवळे येथील प्रसिद्ध शांतादुर्गा मंदिर परिसरात गोवेकर जोग मंडळींनी अतिशय छान आयोजित केले होत. सुमारे २०० जोग बंधु-भगिनी संमेलनास हजर होत्या, हे संमेलन पुण्याचे प्रसिद्ध वकील व माजी उपमहापौर श्री. प्र. बा. जोग यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले व त्या संमेलनात विचार जागृति निर्माण झाली. बारावे संमेलन जानेवारी १९८९ मध्ये वाई येथे श्री. राम जोग व श्री. व्हि. एम्. जोग, पुणे या बंधुंनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने केले. संमेलन राजशाही थाटात झाले. प्रतापगड, महाबळेश्वर दर्शन सर्व जोग बंधु भगिनींना व्हि. एम्. जोगं बंधूंकडून स्पेशल बसेसने घडविले गेले. सुमारे ३०० जोग बंधु भगिनींनी भाग घेतला. या संमेलनाचा थाट, उपस्थिती व संमेलन यशस्विता याबाबत सर्व संमेलनात उच्चांक आहे. थोडक्यात न भूतो न भविष्यति. या संमेलनांत जोगांतील प्राविण्यप्राप्त तरुणांचा सत्कार करण्यात कुलवृत्तांतासाठी निधी, विश्वस्तनिधीसाठी देणग्या जमल्या व कुलवृत्तांत तयार करून १९९० चे संमेलनांत प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला. के. डॉ. हेडगेवार यांचे सेनापती कै. मार्तंडराव जोग, नागपूर यांच्या पत्नी श्रीमती आला.

विमलाबाई यांनी संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले होते हे ही वैशिष्ट्य. १९७७ ते १९८९ अखेर सलग १२ वर्षांत १२ संमेलने पुढीलप्रमाणे झाली.
डिसेंबर
१९७७ नांदिवडे
डिसेंबर १९७८ सांगली
जानेवारी १९८० गोवा (कवळे) जानेवारी १९८१ जयगड
जानेवारी १९८२ मोरगांव जानेवारी १९८३ शिरढोण (रायगड)
जानेवारी १९८४ नांदिवडे जानेवारी १९८५ हावनूर (कर्नाटक)
जानेवारी १९८६ श्री कहाटेश्वर जानेवारी १९८७ नांदिवडे
मंदिर
जानेवारी १९८८ जोग राम मंदिर, जानेवारी १९८९ वाई (सातारा)
पुणे.
१९८३ चे शिरढोण येथील संमेलनाचे आयोजन क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची नातसून, जोगांची माहेरवाशिण सौ. सरला शिवराम फडके यांनी आवर्जून केले होते हे या संमेलनाचे वैशिष्ट्य होते. १९८४ चे संमेलनात जोग विश्वस्त निधीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यावर्षी संस्थेची स्थापना होऊन संस्था रजिस्टर करण्यात आली व त्याचे प्रथम अध्यक्ष पु. त्रिं. जोग निवडले गेले.
संमेलनाचे फलित –
१. अनेक जोग बंधु भगिनींना मूळगांव व कुलस्वामिनीची माहिती झाली.
२. दूरदूरच्या जोग बंधु भगिनींनी मूळगांव पाहिला. श्री कुलस्वामी श्री कन्हाटेश्वर व कुलस्वामिनी जोगेश्वरीचे दर्शन घेतले.
३.अनेक ठिकाणी विखुरलेले व नेहमी एकमेकांस पाहणारे, जोग म्हणून ओळखणारे, परंतु कधीही एकमेकांशी न बोलणारे जोग बंधु भगिनी संमेलनांत भेटली, त्यांतून परिचय वाढला व आत्मीयता निर्माण झाली.
श्री कुलस्वामिनी व श्री कुलस्वामीचे पुजेची नित्य व्यवस्था आर्थिकदृष्ट्या नीट झाली. श्री कन्हाटेश्वर मंदिराचा एक भाग खचल्याने व इतर दुरुस्तीचे येणाऱ्या खर्चाचे बिकट काम श्री. व्हि. एम्. जोग इंजिनिअर, व श्री. पा. रा. जोग, पुणे यांनी पूर्ण केले व खर्चासाठी निधी जमविला. जोग विश्वस्त निधी निर्माण झाला. त्याचे व्याजातून जोग बंधु भगिनींना साहाय्य मिळणे शक्य होईल.
७ .जोग कुलवृत्तांत (१९९० पर्यंतचे माहितीचा तयार करून) प्रकाशित बदललेली आहेत. अशा परिस्थितीत माहिती मिळविणे अवघड काम झाला. गेल्या ४० वर्षांत बहुतांश जोग मंडळींची राहण्याची स्थाने
८. टक्के जोग कुटंबिय
९. सुकर झाले हे केवळ संमेलनामुळेच. स्नेहभाव परस्परांत वाढला. कुलवत्तांतावरून असे दिसते की ९५ सुखासमाधानांत व मानाने जगतात, बहुसंख्य जोग भगिनी निरनिराळ्या क्षेत्रांत उच्चशिक्षित असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक जोग अनेक क्षेत्रांत स्वतच्या उद्योगात वाटचाल करीत असल्याचे आढळले. जोग भगिनी व माहेरवाशिणी अत्यंत आपुलकीने व उत्साहाने संमेलनात भाग घेतात व आपल्या पिवृकुलास सहाय्य करतात ही कौतुकास्पद गोष्ट आहे.
१०. जोग कुलाला भूषणास्पद, सुप्रसिद्ध कुस्तीपटु, वारकरी सांप्रदायाचे कै. गुरुवर्य सोनोपंत दांडेकरांचे आध्यात्मिक गुरु, वारकरी कै. विष्णुबुवा जोग, उपनिषदतीर्थ कै. डॉ. द. वा. जोग, वाडिया कॉलेजचे संस्थापक कै. प्रि. व्हि. के. जोग, बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष कै. चिं. वा. जोग, प्रथम कुलवृत्तांताचे संकलक कै. श्रीपाद बाजी व कै. रंगनाथ भिकाजी आदि अनेक आदरणीय पूर्वजांबद्दल अभिमान वाटू लागून ते आमचेच आहेत हे कळल्याचा आनंद निर्माण झाला हे संमेलनाचेच फलित नव्हें काय 7 आजही आपल्यांतील कांहीं कुलबंधु निरनिराळ्या क्षेत्रांत प्रसिद्ध आहेत त्यांपैकी काही क्षेत्रांतील व्यक्ति माजी पोलिस महासंचालक सूर्यकांत शं. जोग, अमरावती, श्री. अशोक दत्तात्रय जोग, महाराष्ट्र राज्य आय. जी. पी. वायरलेस, व्हि. एम्. जोग कन्स्ट्रक्शन्स लि. चे श्री. वि. म. उर्फ दादासाहेब जोग, जागतिक कीर्तीचे व्हायोलिनपटू पद्मभूषण व्ही. जी. जोग, कलकत्ता, तरुण पिढीतील पुण्याचे डिरोना रोहित्राचे श्री. पी. एन. जोग, पुणे, पी. जोग क्लासचे संचालक श्री. सुहास जोग, नवे तरुण नट संजय व अनंत जोग, संगीत दिग्दर्शक प्रभाकर जोग व लहान वयात एका लिमिटेड
कंपनीचे अध्यक्ष झालेले श्री. माधव विष्णु जोग, पुणे इत्यादींसारख्या कर्तृत्त्ववानांमुळे नव्या पिढीत उत्साह निर्माण होत आहे. १९८१ च्या जयगड संमेलनाचे अध्यक्ष पुण्याचे राम मंदीरवाले श्री. पा. रा. जोग यांनी गेली वर्षे प्रत्येक योजनेत भरघोस आर्थिक मदत केलीच परंतु त्यांचेमुळे कार्यकर्त्यांत उत्साह वाढला. कुलवृत्तांताच्या संकलनानंतरचे अवघड काम प्रकाशन समितीने श्रमपूर्वक व सुंदरतेने, वेळेवर पुरे करुन कुलवृत्तांत १९९० प्रकाशनासाठी सिद्ध केला याबद्दल सर्व समिती सदस्य अभिनंदनास पात्र आहेत. मात्र ज्येष्ठ व श्रेष्ठ
इंजिनियर श्री. द. पां. जोग यांचे प्रकाशनपूर्व निधन झाल्याचे दुख आहे. यापुढेही जोग कुल बंधु भगिनी निरंतर जोग स्नेहसंमेलनें भरवून आपल्या कुलाचे उत्कर्षासाठी व परस्परांना साहाय्य करण्यासाठी योजना आखून त्याची पूर्तता करतील ही अपेक्षा. सर्व जोग बंधु भगिनींना शुभेच्छा. 

दिनांक २७.१.१९९० स्नेहसंमेलन नांदिवडे
डॉ. मा. वि. जोग (जयगड)
पु. त्रिं. जोग (नांदिवडे)
प्रवर्तक जोग स्नेहसंमेलन.

Begin typing your search term above and press enter to search. Press ESC to cancel.